जिल्ह्यात
23 लाख 25 हजार वृक्षलागवड:143 टक्के उद्दीष्टपूर्ती
लोकसहभागामुळेच
पुणे जिल्ह्यात उद्दीष्टपूर्तीहून अधिक वृक्षलागवड
-
पालकमंत्री
गिरीश बापट
पुणे
दि. 1: एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात 23 लाख 25
हजार वृक्षलागवड झाली झाली आहे. लोकांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे व प्रशासनाच्या
काटेकोर नियोजनामुळे जिल्ह्यात उद्दीष्टपूर्तीहून अधिक वृक्षलागवड झाली असल्याची माहिती
पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
श्री. बापट म्हणाले, वनमहोत्सवा निमित्त राज्य
शासनाच्यावतीने राज्यभरात एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात
आला होता. या उपक्रमाला लोकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. या उपक्रमात शासनाच्या विविध
विभागांबरोबरच सार्वजनिक संस्था, खासगी संस्था, उदयोजक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व
स्तरातील नागरीकांनी सहभाग घेतला. त्यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त
झाले आहे. वृक्षलागवड हा केवळ उपक्रम नसून ती एक चळवळ आहे. ही चळवळ कायमस्वरूपी सुरु
ठेवली पाहिजे. केवळ वृक्षलागवड करुन न थांबता लावलेली सर्व झाडे जगविण्यासाठी सर्वांनी
प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्याला 16 लाख 27 हजार
वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र लोकांच्या उत्स्फुर्त सहभागाबरोबच
प्रशासनाच्या योग्य नियोजन व समन्वयामुळे वृक्षलागवडीचे उद्दीष्टपूर्तीपेखा अधिक वृक्षलागवड
जिल्ह्यात होवू शकली आहे. उद्दीष्ठाच्या 143 टक्के वृक्षलागवड जिल्ह्यात झाली असून
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. या
उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी सर्व नागरीकांना धन्यवाद देतो, यापुढे वृक्षलागवडीची
ही चळवळ अशीच सुरु ठेवावी असे आवाहन श्री. बापट यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment