Thursday, September 29, 2016

पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी
मदत केली जाईल : महसुलमंत्री चंद्रकांत पाटील
       पुणे, दि. 29 : पत्रकार म्हणून काम करताना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी शासन म्हणून काही करणे आवश्यक आहे.  तेथे आवश्यक मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
            महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कर्वे रोड येथील सभागृहात नूतन अध्यक्ष राजा माने यांचा सत्कार व जेष्ठ पत्रकार अनंत दिक्षित यांना स्व. जवाहरलाल दर्डा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकमत समुहाचे संपादक दिनकर रायकर, संघटनेचे संघटक संजय भोकरे,  दै. लोकमतचे संपादक विजय बावीस्कर, मावळते अध्यक्ष गोविंदराव घोळवे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की पत्रकार समाजात धाडसाने काम करीत असताना पत्रकारांनी समाजाचे  विविध विषय चळवळ म्हणून चालविले आहेत. यामुळे अनेक विषयांना बळ मिळते. अशा पत्रकारांचे जीवन सुरक्षित होण्यासाठी पत्रकारांचे वाढते वय, जबाबदा-या पार पाडणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, कुटूंबाला चांगल्या आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. पत्रकारांनी अटल पेन्शन योजना, अपघात व बिमा सुरक्षा योजनेचाही लाभ घेण्याबाबत सूचित केले.
            याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अनंत  दिक्षित पत्रकारांनी अभ्यासाने ताकत वाढविली पाहिजे. कायद्याचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर समाजातल्या दुबळया माणसापर्यंत आपली लेखणी पोहोचली पाहिजे याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषणात दिनकर रायकर यांनी पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे. नि:पक्षपातीपणे काम करुन राज्याला, देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
            यावेळी नूतन अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांच्या विविध अडचणी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करुन प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
                                                                        0000


Tuesday, September 27, 2016

जिल्हयात सरासरी 2.6 मि.मी.पाऊस व धरणातील उपयुक्त पाणी साठा

जिल्हयात सरासरी 2.6  मि.मी.पाऊस

पुणे, दि. 28 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात सरासरी 2.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आजअखेर एकूण 12490.7 मि.मी एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 960.8 मि.मी. आहे.
बुधवार, दि. 28  सप्टेंबर,2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली 0.0 मि.मी.(359.7 मि.मी) मुळशी 0.0 मि.मी. ( 2032.3 मि.मी) भोर 0.0 मि.मी (1778.9 मि.मी) मावळ 0.0 मि.मी. (2309.4 मि.मी) वेल्हा 0.0 मि.मी (1751.9 मि.मी) जुन्नर 0.1 मि.मी (1068.5 मि.मी) खेड 0.0मि.मी. (759.4 मि.मी) आंबेगाव 0.0 मि.मी. (648.6 मि.मी) शिरुर 14.4 मि.मी.  (358.3 मि.मी) बारामती 5.3 मि.मी (382.2 मि.मी) इंदापूर 1.0 मि.मी  (411.2 मि.मी) दौंड 10.9 मि.मी. (394.6 मि.मीआणि पुरंदर 1.7 मि.मी. (235.8 मि.मी)
000000





धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. 28: पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. 28 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जोगे
215.91
82.37
3.20
2
माणिकडोह
224.99
71.21
7.24
3
येडगाव
33.47
24.36
0.68
4
वडज
35.91
100.00
1.17
5
डिंभे
382.06
100.00
12.49
6
घेाड
215.84
99.70
5.45
7
विसापूर
5.70
22.26
0.20
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
241.69
100.00
7.57
10
भामा आसखेड
229.88
99.64
7.64
11
वडीवळे
40.87
100.00
1.07
12
आंद्रा
83.31
100.00
2.92
13
पवना
272.12
100.00
8.51
14
कासारसाई
16.92
97.14
0.55
15
मुळशी
534.12
99.69
18.40
16
टेमघर
90.49
83.36
3.09
17
वरसगाव
375.36
100.00
12.82
18
पानशेत
310.61
100.00
10.65
19
खडकवासला
85.91
100.00
1.97
20
गुंजवणी
61.31
100.00
2.16
21
नीरा देवधर
337.40
100.00
11.73
22
भाटघर
672.65
100.00
23.50
23
वीर
278.49
100.00
9.41
24
नाझरे
9.062
20.31
0.12
25
उजनी
3259.96
96.04
51.45
*********



  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...