Wednesday, August 31, 2016

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

जिल्हा दक्षता समितीची
बैठक संपन्न
          पुणे,दि. 31: जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा कार्यालयात संपन्न झाली.
        सदर बैठकीत अशासकीय सदस्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबतच्या जनतेच्या तक्रारी मांडल्या. तसेच बचतगटाना स्वस्तधान्य दुकाने देण्यात आली आहेत, ती दुकाने इतर व्यक्ती चालवितात अशी  तक्रार बैठकीत मांडण्यात आली. दुकानाच्या नावासह तक्रार केल्यास त्याची निश्चित दखल घेऊन तथ्य आढळल्यास आवश्यक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्याप्रमाणे पुरवठा विभागाच्या वतीने वर्षात करण्यात आलेल्या  कार्यवाहीची  माहिती  दिली.
           तसेच शासन निर्णयानुसार  तूरडाळ स्वस्त धान्य दुकानात व विविध मॉलमध्ये करण्यात आलेल्या विक्रीबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीस उपस्थित सदस्यांनी धान्याच्या गोडावूनला भेट देण्याबाबत मागणी केली. त्यानुसार इच्छूक सदस्यांनी भेट देवून पाहणी करण्याबाबत  सांगण्यात आले.
            या बैठकीस अशासकीय सदस्य श्रीमती विजया शिंदे, श्रीमती ज्योती गायकवाड, चेतन अगरवाल, श्रीमती  पल्लवी सुरसे, निलेश जठार, अमृत शेवकरी, निहाल घोडके आदि उपस्थित होते.
0000000


Tuesday, August 30, 2016

धरणातील उपयुक्त पाणी साठा

धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. ३१: पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. ३१ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (द. ल. घ. मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. ल. घ. मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
   1
पिंपळगाव जोगे
     २२७.२२
९२.६४
३.६०
2
माणिकडोह
२१४.१५
६७.४५
६.८६
3
येडगाव
५८.९५
५६.५०
१.५८
4
वडज
३३.३९
९२.३९
१.०८
5
डिंभे
३७४.८८
      ९७.९७
१२.२४
6
घेाड
१८९.१५
८२.४६
४.५१
7
विसापूर
१.३१
५.१०
०.०५
8
कळमोडी
४२.८७
१००.००
१.५१
9
चासकमान
२४१.६९
१००.००
     ७.५७
10
भामा आसखेड
२२८.६६
९९.०८
७.६०
11
वडीवळे
४०.८७
१०व०.००
१.०७
12
आंद्रा
८३.३१
१००.००
२.९२
13
पवना
२७२.१२
१००.००
८.५१
14
कासारसाई
१७.१५
९८.५७
०.५६
15
मुळशी
५३५.७६
१००.००
१८.४६
16
टेमघर
९५.४१
८८.०५
३.२६
17
वरसगाव
३७५.३६
१००.००
१२.८२
18
पानशेत
३१०.६१
१००.००
१०.६५
19
खडकवासला
८५.९१
१००.००
१.९७
20
गुंजवणी
६१.३१
१००.००
२.१६
21
नीरा देवधर
 ३३७.४०
१००.००
११.७३
22
भाटघर
       ६७२.६५
१००.००
२३.५०
23
वीर
२७८.४९
१००.००
९.४१
24
नाझरे
       १०.४१४
२८.४३
        ०.१७
25
उजनी
२७३७.३६
६१.६०
  ३३.००
***********


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...