Friday, September 18, 2020

 




'कमवा व शिका' योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

 

            पुणे दि.18:- पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

            विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, समाज कल्याण विभागाचे सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार  तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

            गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक वेतनही देण्यात येणार आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश प्रदान

 

            पुणे जिल्हयातील अखिल भारतीय वारकरी मंडळ, हवेली तालुका कमिटीच्या वतीने 1 लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 साठी सुपूर्द करण्यात आला यावेळी मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे देहूकर व अन्य पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.

००००

Thursday, September 17, 2020

 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

 

            पुणे दि.18:  पमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

           

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौ-यांला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लकडी पूल व स्वारगेट  येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणा-या नवीन मशिनचेही मेट्रोकामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेट्रोचे गौतम बि-हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

Monday, August 3, 2020

ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे

    काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

 

            पुणे दि. 3 :- पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज औंध येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन खाटानिर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची, तसेच नॉन-कोवीड रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयाकडून सुरु असलेल्या उपचाराबाबत विचारपूस केली.  यावेळी कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. शर्मिला गायकवाड, डॉ. किरण खलाटे, यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरासह ग्रामीण भागातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारी वर्ग चांगले काम करत आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बळकटीकरणाकरीता निधीची कमतरता पडणार नाही. रुग्णालयाचे बळकटीकरण करतांना दर्जेदार काम करण्यार भर असला पाहिजे. कोरोना सारख्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोईसुविधा देण्यावर आमचा भर आहे, असेही जिल्हाधिकारी श्री राम म्हणाले.

जिल्हाधिकारी राम यांनी ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुरु असलेल्या कामकाजाची माहिती घेवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

 

*****

 








Sunday, July 12, 2020






लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे
                        -उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर

        पुणे,दि.12:- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे  कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.
            शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा. लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत. यासाठी प्रत्येकाने साथ देवून पुढाकार घेऊन स्वत:ला 'कोरोना योध्दे' समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, असे आवाहन उपसंचालक डॉ.गंगाखेडकर यांनी केले.
००००

Monday, April 6, 2020





कोविड -19  स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबच्या डॉक्टरांसोबत
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी घेतली बैठक

            पुणे दि.5:- कोविड -19  संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या एनआयव्ही, बी.जे.मेडिकल (ससून हॉस्पिटल), एएफएमसी, एजी डायग्नोस्टीक, मेट्रोपोलिस तसेच  खाजगी लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर तसेच शासकीय व खाजगी लॅबचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
             कोविड-19 संशयीत रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी लॅबमध्ये दररोज किती नमुने तपासणीसाठी प्राप्त होतात, त्यापैकी किती नमुने तपासले जातात आदि विषयांबाबतचा आढावा डॉ.म्हैसेकर यांनी  यावेळी घेतला. रुग्णांच्या स्वॅबची तपासणी गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
फ्ल्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्ण तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा
जिल्हाधिकारी नवल किशोर राम
            कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने फ्ल्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्ण तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांनी स्वतंत्र कक्ष (ओपीडी) तात्काळ स्थापन करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खाजगी रुग्णालय प्रमुखांना केल्या. खाजगी रुग्णालयांनी कोविड-19 संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने मान्यता प्राप्त लॅबकडून तपासून घेवून अहवाल मागवावा तसेच पॉझिटीव्ह रुग्णांचा चाचणी अहवाल तात्काळ जिल्हा परिषदेच्या एकात्मिक साथ रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी)  कक्षाकडे पाठवावा, जेणेकरुन कोरोना सांसर्गिक रुग्णांवर वेळेत उपचार करणे सोयीचे होईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.राम यांनी यासंबंधी विविध विषयांचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही यावेळी आवश्यक त्या सूचना केल्या.
0000









ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची
 विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पहाणी


            पुणे, दि.5 : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. यावेळी पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी.बी.कदम यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
 
        जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून ससून हॉस्पिटलमध्ये नवीन इमारतीत आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. याबाबतची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वैद्यकीय सेवा सुविधेबद्दल डॉ.म्हैसेकर यांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीत यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर आदी बाबींवर चर्चा झाली. ससून रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
0000



Wednesday, March 18, 2020





आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली
राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट
                               
            पुणे, दि, १८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली.    यावेळी संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबर बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. यावेळी संचालक प्रिया अब्राहम, विभाग प्रमुख वर्षा पोतदार, डॉ.बसू, डॉ.सहारा चेरीयन, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील,बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपा अपर आयुक्त रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
००००


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...