Saturday, October 1, 2016

धरणातील उपयुक्त पाणी साठा व जिल्ह्यात सरासरी 33.3 मि.मी. पाऊस

धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. 2: पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. 2 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
   1
पिंपळगाव जोगे
216.16
82.60
3.21
2
माणिकडोह
226.78
71.84
7.31
3
येडगाव
38.99
31.32
0.88
4
वडज
35.81
99.70
1.17
5
डिंभे
382.06
100.00
12.49
6
घेाड
215.10
99.22
5.42
7
विसापूर
7.93
30.96
0.28
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
241.30
99.82
7.56
10
भामा आसखेड
229.88
99.64
7.64
11
वडीवळे
40.87
100.00
1.07
12
आंद्रा
83.31
100.00
2.92
13
पवना
272.12
100.00
8.51
14
कासारसाई
16.92
97.14
0.55
15
मुळशी
533.70
99.61
18.39
16
टेमघर
88.73
81.69
3.03
17
वरसगाव
375.36
100.00
12.82
18
पानशेत
310.61
100.00
10.65
19
खडकवासला
85.44
99.16
1.96
20
गुंजवणी
61.31
100.00
2.16
21
नीरा देवधर
337.40
100.00
11.73
22
भाटघर
672.65
100.00
23.50
23
वीर
278.49
100.00
9.41
24
नाझरे
9.039
20.17
0.12
25
उजनी
3347.00
101.78
54.53
***********




जिल्ह्यात सरासरी 33.3 मि.मी. पाऊस

पुणे दि. 2 :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 13.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 12948.7 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  996.1 मि. मीआहे.
रविवार दि. 2 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  23.4  मि.मी.  (387.8 मि.मी.), मुळशी 39.2 मि.मी. (2071.4 मि.मी.), भोर 67.6 मि.मी. (1846.5 मि.मी.), मावळ 13.3 मि.मी. (2340.7 मि.मी.), वेल्हा 43.5  मि.मी.        ( 1795.4 मि.मी.), जुन्नर 15.1   मि.मी. (1088.6 मि. मी.), खेड 26.9 मि.मी. (787.8 मि.मी.), आंबेगाव 22.6 मि.मी. (672.2 मि.मी.), शिरुर 33.0 मि.मी.  (399.8 मि.मी.), बारामती 39.0 मि.मी. (421.2) मि. मी., इंदापूर 37.9 मि.मी. (451.8 मि.मी.), दौंड 20.9  मि.मी. (417.7 मि.मी.) आणि पुरंदर 32.0 मि.मी. (267.8  मि.मी.)
0000



विक्रीकर दिन सोहळा संपन्न
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमूख
होऊन कर संकलन वाढवावे
                                                                     ... पालकमंत्री गिरीश बापट

           पुणे,दि. 01 :-  विक्रीकर हा राज्याच्या महसूलाचा एक महत्वाचा भाग असून हे महसूली उत्पन्न राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी व विविध विकास कामांसाठी उपयोगात येते. यासाठी विक्रीकर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमूख होऊन कर संकलन वाढवावे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
           विक्रीकर दिनाच्या निमित्ताने आज यशदा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर प्रशांत जगतात, आमदार शरद रणपिसे, अप्पर विक्रीकर आयुक्त ओ.चै.भांगडीया यांच्यासह विक्रीकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ज्या करदात्यांना आज गौरविण्यात आले ते सन्मानार्थी उपस्थित होते.
           शासनाचा चेहरा म्हणून व्यापाऱ्यांसमवेत, जनतेशी संवाद साधतांना, त्यांच्याशी संपर्क करताना विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वर्तणूक आणि संपर्क या गोष्टी महत्वाच्या ठरतात असे सांगून पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन कर संकलन वाढवावे. जीएसटी’ मुळे देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत मोठी सुधारणा होत आहे. अशास्थितीत विक्रीकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची जीएसटी’च्या अंमलबजावणीतील भूमिका अधिक निर्णायक ठरणार आहे. त्यादृष्टीने विक्रीकर विभागाने केलेली तयारी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही पालकमंत्र्यांनी काढले. वस्तु व सेवाकर प्रणालीमुळे एकसमान कर, एकसमान कर प्रणाली अस्त्विात येणार असेही ते म्हणाले.
           जीएसटी’चा प्रचार व प्रसार लोकप्रतिनिंधी प्रभावीपणे करावा असे आवाहन आमदार शरद रणपिसे यांनी यावेळी बोलताना केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करप्रणाली  सुटसुटीत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
           राष्ट्राच्या उभारणीमध्ये  विक्रीकर विभागाचा वाटा मोठा आहे, असे सांगून महापौर प्रशांत जगताप यांनी विक्रीकर विभागाने जीएसटी’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची सूचना केली.
           यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते कर निर्धारण व कर संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या आठ संस्था आणि पाच विक्रीकर निरिक्षकांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रशस्तीपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. वस्तू व सेवाकर-एक दृष्टीक्षेप’ या माहितीपूर्ण पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.
           विक्रीकर दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. अशाप्रकारे विक्रीकर दिन साजरा करण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला.
           या कार्यक्रमास व्यापारी, नागरिक, कर सल्लागार, विक्रीकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते

000




  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...