लॉकडाऊन कालावधीत
नागरिकांनी सहकार्य करावे
-उपसंचालक
डॉ.रमण गंगाखेडकर
शासनाने
घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा.
लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरातील कुठल्याही व्यक्तीला
ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर,
सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत. यासाठी प्रत्येकाने साथ देवून पुढाकार
घेऊन स्वत:ला 'कोरोना योध्दे' समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, असे आवाहन उपसंचालक
डॉ.गंगाखेडकर यांनी केले.
००००