टंचाई परिस्थितीवर मात
करण्यासाठी
सर्व प्रमुख धार्मिक
न्यासाच्या विश्वस्तांनी मदत करावी
पुणे,दि.२२- राज्याच्या अनेक जिल्हयांत टंचाई परिस्थिती
निर्माण झाली असून परिणामी चारा टंचाई व पाणी टंचाईमुळे पशुधनावर परिणाम होणार
आहे. यासाठी पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्हयांतील मंदिर,
मस्जिद,चर्च इत्यादी सर्व प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनी दुष्काळी
परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त
शिवकुमार डिगे यांनी केले आहे.
पुणे येथील विधान भवनाच्या पाठीमागील
अल्पबचत हॉलमध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्हयातील
प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनी
जिल्हयातील चारा छावण्यांच्या नियोजनासंदर्भात चर्चा व योग्य ती कार्यवाही
करण्यासाठी प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांची बैठक राज्याचे धर्मादाय आयुक्त
शिवकुमार डिगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख, धर्मादाय उपआयुक्त नवनाथ
जगताप,अधीक्षक अभिजित अनाप, के. डी.शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी पुण्याचे धर्मादाय उप आयुक्त
नवनाथजी जगताप व काही धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार
अधिक्षक के.डी.शिंदे यांनी मानले. यावेळी
धार्मिक न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते.
००००